शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामलेखा समन्वयकांची ६९ रिक्त पदे ‘बाद’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:56 IST

जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामलेखा समन्वयकांची १७३ पदे मंजूर होते. रिक्त राहिलेली ६९ पदे आता बाद केली असून, पश्चिम वºहाडातील सहा पदांचा यामध्ये समावेश आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या दोन्ही योजनाांची यशस्वीरित्या हाताळणी करणे आणि दोन्ही यंत्रणांच्या कामांमध्ये समन्वय राहण्याकरीता राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामलेखा समन्वयकांची १७३ पदे मंजूर होते. रिक्त राहिलेली ६९ पदे आता बाद केली असून, पश्चिम वºहाडातील सहा पदांचा यामध्ये समावेश आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या दोन्ही केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाबी यशस्वीरित्या हाताळणे सोयीचे जावे याकरीता या दोन्ही यंत्रणांच्या कामांमध्ये सुसुत्रीपणा आणणे, त्यांच्या समन्वय राहण्यासाठी या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीकरीता वाशिमसह राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक ते मनुष्यबळ व पदांची निर्मिती केली होती. ३४ ग्रामीण जिल्ह्यांमधील १७३ उपविभागांमध्ये ग्रामलेखा समन्वयकांच्या १७३ पदांना मंजूरीही दिलेली होती. यापैकी या ना त्या कारणाने ६९ पदे रिक्त होती. या रिक्त पदांमध्ये पश्चिम वºहाडातील वाशिम जिल्ह्यातील दोन, बुलडाणा जिल्ह्यातील १ आणि अकोला जिल्ह्यात दोन पदांचा समावेश होता. आता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २६ आॅक्टोबर रोजी रिक्त पदे बाद ठरविल्याने ती पदे भरता येणार नाहीत. रिक्त पदे ‘निरसित’ (बाद) केली असून, ती पदे भरण्यात येऊ नये, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरी यंत्रणेला दिल्या आहेत. सुधारीत मंजूर पदेसंख्येनुसार आता वाशिम जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात चार आणि अकोला जिल्ह्यात तीन ग्रामलेखा समन्वयक कायम राहिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात ग्रामलेखा समन्वयकांची पाच पदे मंजूर होती. यापैकी तीन पदे भरण्यात आली आहेत. रिक्त असलेली दोन पदे निरसित केल्याने आता ती भरता येणार नाहीत.- सुदाम इस्कापेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय