शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गावोगावी स्वच्छता रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:47 IST

अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हयात गावोगावी स्वच्छता रॅली काढली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने  जिल्ह्यात‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हयात गावोगावी स्वच्छता रॅली काढली जात आहे. २५ सप्टेंबर रोजी इंझोरी, काटा, जऊळका, किन्हीराजा यासह ४५ गावांत स्वच्छता रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी धारण केलेल्या पारंपरिक वेशभुषा आणि कलापथकाने सर्वांचे लक्ष वेधले स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे  ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान व्यापक पद्धतीने राबविले जात आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, स्चच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्यासह गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ सहभाग घेत आहेत. इंझोरी येथील रॅलीत अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक नऊवारी पातळे परिधान करून सहभाग घेतला, तर लेझीम पथकाने कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद