शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:44 IST

आपला गाव नेहमीच स्वच्छ राहावा म्हणून येथील महिला दर एकादशीला ग्रामसफाईचा उपक्रम राबवित आहेत.

- बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: देशभरात स्वच्छता अभियानासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असतानाही स्वच्छतेबाबत बहुतेक ठिकाणी जनता गंभीर नाही. तथापि, मानोरा तालुक्यातील भुली हे गाव याला अपवाद ठरत असून, आपला गाव नेहमीच स्वच्छ राहावा म्हणून येथील महिला दर एकादशीला ग्रामसफाईचा उपक्रम राबवित आहेत. त्यांचा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.राज्य आणि केंद्र शासनाने संपूर्ण देशात गेल्या पाच वर्षांपूर्वी स्वच्छता अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत असताना अनेक वेळा दिशानिर्देश देण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयही घेतले. त्यामुळे बराच फरक पडला असला तरी, ग्राम स्वच्छतेबाबत जनता फारशी गंभीर नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मानोरा तालुक्यातील भुली हे गाव मात्र, याला अपवाद ठरत आहे. या गावातील महिला दर एकादशीला अर्थात दर पंधरा दिवसांनी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवितात. गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरापासून या कार्याला सुरुवात केली जाते.त्यानंतर या महिला गावातील रस्ते चौक स्वत: हाती झाडू घेऊन साफ करतात आणि गोळा झालेला कचरा पुन्हा पसरून घाण होऊ नये म्हणून गावाबाहेर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावतात. या आदर्श उपक्रमासाठी ताईबाई दोनतकर, गयाबाई पिगांने, वनिता खरोडे, यमुना अंबुरे, नर्मदा इहरे, जिजाबाई खोडके, गंगाबाई पिंगाने, निर्मला शिंदे, लता गावंडे, चंद्रसैना शिंदे, बयनाबाई मोहिते, इंदू भगत, लक्ष्मी तायडे, सुलाबाई वारे, सुमित्रा वारे, कौसलबाई गवई, प्रभा सोनुलकर, सुमन तायडे, लक्ष्मी तायडे, इंदू गेडाम, सुशिला चव्हाण, सुरेखा कवटकर व गजानन गावंडे आदि महिला सहभागी होत आहेत.महिला पोलीस पाटलांचे प्रोत्साहनआपल्या गावात स्वच्छता राहावी आणि जनतेचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून महिला मंडळीने पाच वर्षांपासून गावात दर पंधराव्या दिवशी एकादशीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय स्त्युत्य आणि गावासाठी हितकारी असल्याने गावच्या महिला पोलीस पाटील छाया अरूण डहाके यांनी आपल्या पदाचा विचार करून या महिलांच्या निर्णयाला बळ देण्यासाठी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे, तर त्या स्वत: हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सक्रीय होऊन सर्व महिलांना प्रोत्साहित करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा