शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा ‘वनवास’ संपता संपेना!

By admin | Updated: June 16, 2014 00:41 IST

येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा समस्यांचा वनवास संपता संपेना,

रिसोड : येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा समस्यांचा वनवास संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. या दवाखान्याभोवती व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे कर्मचार्‍यांसह पशुपालक व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दवाखान्याच्या इमारतीला ४७ वष्रे झाली असल्यामुळे तिला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे. येथील पशुचिकित्सालयाची निर्मिती १९६६ ला झाली आहे. पशुचिकिल्सालयाचे क्षेत्रफळ दोन एकर चार आर आहे. या परिसरात पशुवैद्यकीय विकास अधिकारी, कर्मचारी वर्गाचे निवासस्थाने आहेत. सुरुवातीच्या काळात हा परिसर स्वच्छ व इमारती चांगल्या होत्या. आजमितीस परिसरात सर्वत्र घाण, इमारतीची निवासस्थानाची पडझड झाल्याने कर्मचारी वर्ग राहत नाहीत. घाणीमुळे या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिकित्सालयाची संरक्षण भिंत पडल्यामुळे नागरिक या ठिकाणी शौचास बसतात यामुळे दररोज डुकरांचा मुक्तसंचार असतो. कर्मचार्‍यांच्या बसण्याच्या ठिकाणची छताची कौल फुटलेली आहेत. यामुळे पाऊस सुरु असतांना कर्मचार्‍यांना बसायला सुध्दा नीट जागा नाही. शहरातील या पशुचिकित्सालयाला शहरासह नजीकच्या घोंसरवाडी, निजामपुर, मांगवाडी, आगरवाडी, शेलूखडसे, पाचांबा, करडा, सवड, चिंचाबाभर, कंकरवाडी, मुंगसाजी नगर अशा अकरा गावातील कामांचा व्याप आहे व येथे तालुका पशुधन अधिकारी व एक परिचर असे दोघेच कर्मचारी काम पाहतात. पंचायत समितीचा एक कर्मचारी सहाय्यक म्हणून दिल्याची माहिती आहे. येथील चिकित्सालयात एक पशुधन पर्यवेक्षक, एक पट्टीबंधक व दोन परिचर व इतर पाच ते सहा कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. मुबलक मनुष्यबळ आणि भौतिक सुविधांचा अभाव असल्याचा फटका पशुपालकांना बसत आहे. येथील औषधांचा साठा वरिष्ठ स्तरावरुन पुरविल्या जातो. मुलबक प्रमाणात औषधीसाठा असणे आवश्यक आहे. येथे गुरांसाठी एक्सरे मशीन उपलब्ध आहे व जवळपास त्याची किंमत ३0 लक्ष रुपये एवढे आहे. परंतु इमारतीचे छत गळत असल्याने ती मशीन उपयोगात आणणे कठीण आहे. चिकित्सालया भोवतालची दुर्गंधी व घाण ही कर्मचार्‍यांसाठी त्रासदायक असून त्यांना काम करतांना तारेवरची कसरतच करावी लागते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी या बाबीची दखल घेण्याची मागणी पंजाबराव अवचार यांनी केली आहे.