मेडशी (जि. वाशिम): पांगराबंदी जंगलात १७ एप्रिलला सागवान तोडून जात असतांना वनअधिकार्यांवर हल्ला करणार्या आरोपिंना वन कोठडीत विचारपूस करण्यात आली. त्यांनी सांगितलेल्या माहितीवरुन या प्रकरणात वापरलेले वाहन ५ जून रोजी वनविभागाने जप्त केले. पांगराबंदी हल्ल्याप्रकरणात वनअधिकार्यांना हवेत गोळीबार करण्याची वेळ आली होती. या प्रकरणातील तीन फरार आरोपिंना ३ जून रोजी पकडून ४ जूनला न्यायालयात हजर केले असता वन कोठडी सुनावण्यात आली. यामध्ये वनअधिकार्यांनी विचारणा केली असता आधी दिशाभूल व नंतर वन विभागाच्या खाक्याने सत्य माहिती सांगितली. त्या माहितीवरुन अंधारसावगी येथून मोटारसायकल जप्त करण्यात आली. *धरणात वाहनाची केली दोन तास पाहणी पांगराबंदी सागवान तोड व हल्ला प्रकरणात वापरलेली मोटारसायकल गोंधळवाडी धरणात टाकली असे आरोपिंनी सांगितले. आरोपिंना सोबत घेवून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी धरणावर गेले असता दोन तास वाहनाची पाण्यात तपासणी केली. वाहन सापडत नसल्याचे पाहून वनअधिकार्यांनी आपला हिसका दाखविल्याबरोबर खोटी माहिती दिल्याचे निष्पण झाले यामध्ये अधिकार्यांचे दोन तास मात्र वाया गेले.
पांगराबंदी हल्ला प्रकरणातील वाहन जप्त
By admin | Updated: June 6, 2015 01:10 IST