शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही वाहने धावताहेत रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:38 IST

वाशिम : योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले, योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालण्यास धोकादायक असतानाही अशी वाहने सर्रास रस्त्यावरून धावत आहेत.

ठळक मुद्देरस्ते अपघाताच्या घटनांना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून वाहने सुस्थितीत असणे आवश्यक आहे. प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही अनेक वाहने वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही रस्त्यांवरून धावत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले, योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालण्यास धोकादायक असतानाही अशी वाहने सर्रास रस्त्यावरून धावत आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी परिवहन ८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनांसंबंधी कोणती कारवाई करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचना उपप्रादेशिक परिवहन विभागाला २४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आहेत.रस्ते अपघाताच्या घटनांना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून वाहने सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वाहने सुस्थितीत नसतानाही सार्वजनिक रस्त्यांवरून धावत असल्याने अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यात फारसे यश येत नसल्याने दिसून येते. या पृष्ठभूमीवर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणी मोहिम परिवहन विभागातर्फे राबविली जाते. यापूर्वी प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही अनेक वाहने वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही रस्त्यांवरून धावत आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी परिवहन विभागातर्फे राज्यभरात ८ ते २३ आॅक्टोबर २०१८ या दरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने आढळून आल्यास सदर वाहन नजीकच्या दुरूस्ती केंद्रात अटकावून ठेवणे आणि सदर वाहनं दुरूस्तीसाठी प्राप्त झाल्याचे दुरूस्ती केंद्रचालकाचे प्रमाणपत्र तपासणी अधिकाºयांना घ्यावे लागणार आहे. वैध योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सदोष आहे, असे आढळल्यास तपासणी अधिकाºयांनी सदर वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र निलंबित करावे व वाहन हे नजीकच्या दुरूस्ती केंद्रात दुरूस्तीसाठी सुपूर्द करावे लागणार आहे. वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासंदर्भात ८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे.- जयश्री दुतोंडे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडी