शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांपासून सफाई कामगारांपर्यंतची विविध पदे रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 14:43 IST

वाशिम: जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, असे १८५ शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे.

ठळक मुद्दे१८५ शासकीय रुग्णालयांमध्ये २५० पेक्षा अधिक पदे रिक्त! गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त

वाशिम: जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, असे १८५ शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, विविध स्वरूपातील तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाºयांची २५० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने आरोग्य सुविधांचा पुरता बट्ट्याबोळ उडत असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला जिल्ह्यापासून विभक्त होवून १ जुलै १९९८ रोजी नव्याने वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. असे असताना गेल्या १७ वर्षाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अद्याप सक्षम झालेली नाही. जिल्ह्यात सद्या १ जिल्हा सामान्य रुग्णालय, ७ ग्रामीण रुग्णालय आणि १५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अशी १८५ रुग्णालये कार्यान्वित आहेत; परंतू कर्मचाºयांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर जाणवत आहे. 

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १ ची १६ पदे  मंजुर आहेत; मात्र त्यापैकी फक्त ३ पदे भरलेली असून उर्वरीत १३ पदे रिक्त आहेत. यासह वर्ग २ ची १६ पदे मंजूर असून फक्त ८ अधिकारी कार्यरत असून निम्मी म्हणजेच ८ पदे रिक्त आहेत. जिल्हयात ७ ग्रामीण रुग्णालय आहेत. त्यापैकी केवळ ग्रामीण रुग्णालय, कारंजा येथील वैद्यकीय अधिक्षक वर्ग १ चे पद भरलेले आहे. उर्वरीत सहा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक वर्ग १ हे पद रिक्त असल्याची माहिती आहे. वैद्यकीय अधिकाºयांचीही बिकट परिस्थिती असून बहुतांश ठिकाणी ही पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सुविधांचा पुरता फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर