शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम ...

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चार दिवसांपूर्वी दिले. त्यानुसार, गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याने, काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास, ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्या मदतीने घरोघरी जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. या अनुषंगाने ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

०००

कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

- डॉ.अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.