कोरोनाने सर्वत्र अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शिरपूर परिसरातील गावांमध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांसह लसीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. दरम्यान, ८ मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेस सुरुवातीला शिरपूर परिसरातील नागरिकांनी अपेक्षित सहकार्य केले नाही; मात्र मागील चार ते पाच दिवसांत लसीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. शिरपूर येथे ८६३ जणांनी कोरोना लस घेतली आहे. त्याचप्रमाणे पांगरखेडा १२९, तिवळी ३२२, किनी घोडमोड ११३, ताकतोडा १२०, अमानी ३५७, करंजी २७०, चिवरा १८२, दापुरी कालवे १६०, ढोरखेडा १२०, सोमठाणा ९४ अशा एकूण ३०४७ जणांचे शिरपूर आरोग्य आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत लसीकरण करण्यात आले. एकट्या शिरपूरमध्ये १९ फेब्रुवारीपासून शुक्रवारपर्यंत ९०९ जणांची रॅपिड टेस्ट, तर ८६६ जणांची आरपीटीसीआर टेस्ट करण्यात आली. आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे; मात्र इतर ठिकाणचा नेमका आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.
शिरपूर आरोग्य वर्धनी केंद्र अंतर्गत ३०४७ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST