शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अडाण पात्रात टरबुज शेतीचा प्रयोग, नदीकाठावरच विक्री: बुरशी रोगामुळे यंदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:15 IST

मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे.

इंझोरी: मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे त्यांना दरवर्षी भरघोस उत्पन्नही मिळते; परंतु यंदा मात्र टरबुजावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे त्यांच्या उत्पादनात घट येत असल्याचे दिसत आहे.मानोरा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात बुडीत क्षेत्रात परजिल्ह्यातील शेतकरी टरबूज आणि खरबुजाची शेती करतात. पाणथळीच्या आणि रेताड जागेत हे पीक चांगले येते. त्यामुळेच या शेतकºयांना गेल्या काही वर्षांत या प्रयोगातून भरघोस उत्पन्नही मिळाले. विशेष म्हणजे हे शेतकरी पिक लेल्या टरबुज आणि खरबुजांपैकी ३० टक्के माल हा अडाण नदीवर बांधण्यात आलेल्या पुलानजिकच बसून विकत असतात. त्यामुळे त्यांना अधिक फायदाही होतो. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतमजुरांनाही उन्हाळ्यांच्या दिवसात  तीन ते चार महिने रोजगारही उपलब्ध होतो. एकंदरीत हा प्रयोग शेतकरी आणि शेतमजुरांसाठी उपयुक्त ठरत आहे. यंदाही या ठिकाणी याच शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. सुरुवातीला या पिकातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळाले; परंतु आता या पिकांवर बुरशीचा रोग आल्याने फळांचा आकार लहान होत असून, वेलींना फ ळधारणाही कमी झाली आहे. त्यामुळे या शेतकºयांचे यंदा मात्र नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.