शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात प्रथिनांचा वापर गरजेचा -डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:18 IST

Interview with Doctor जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, यापासून बचाव म्हणून सर्वत्र आवश्यक  प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरीर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध आजारास प्रतिबंध करणे आदीचे कार्य प्रथिनांमधून होते. आहारामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी, नास्त्यामध्ये इडली, सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, पाण्यात भिजवून बदाम अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल. भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये कैरी, टमाटर, काकडी, बीट, मेथी याचा वापर करावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून धुऊन घ्यावे.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहेच; परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीकशक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सकस आहार नियमित घेणे आवश्यक आहे.

कोणती फळे सेवन करावी आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.

शरीराचे हायड्रेशन कसे संतुलित ठेवावे ?सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराचे हायड्रेशन संतुलित ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदींचा उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा, मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत