शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात पशू संवर्धन विभागाकडून खाजगी व्यक्तीचा वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:13 IST

इंझोरी: परिसरात गुरांवर होत असलेल्या घटसर्प आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशूधन विभागाकडून सोमवारी लसीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देजनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. २ वर्षांपासून पशूसंवर्धन विभागाकडून कुठल्याच प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही. लसीकरण मोहिमेची तयारीही केली, परंतु या कामासाठी त्या स्वत: न येता त्यांनी चक्क खाजगी व्यक्तींना पाठविले.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: परिसरात गुरांवर होत असलेल्या घटसर्प आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशूधन विभागाकडून सोमवारी लसीकरण करण्यात आले. यासाठी चक्क खाजगी व्यक्तींचा आधार घेण्यात सोमवारी दिसून झाले. लोकमतनेच २३ जुलैच्या अंकात ‘घटसर्प’मुळे १४ गावांमधील गुरांचे आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल पशूधन विकास अधिकाºयांनी घेत पशूधन पर्यवेक्षकांना तातडीने लसीकरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे १४ गावांतील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच या परिसरात २ वर्षांपासून पशूसंवर्धन विभागाकडून कुठल्याच प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही आणि पशूवैद्यकीय अधिकारीही फिरकले नाहीत. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाºयावर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. इंझोरी परिसरात आता सततच्या पावसामुळे गुरांवर विविध आजारांची लागण होत असून, त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने या परिसरातील १४ गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंझोरी, चौसाळा, धानोरा, भोयणी, नायणी, खापरी, खंडाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, अजनी, जामदरा, तोरणाळा, उंबर्डा, म्हसणी आदि गावांतील गुरांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. काही गुरे आजार बळावल्यामुळे दगावण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच पशू संवर्धन विभागाकडून दखल न घेण्यात आल्याने पशूपालकांत संतापाची लाट उसळली होती. या पृष्ठभूमीवर लोकमतने २३ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले. याची दखल मानोराच्या पशूधन विकास अधिकाºयांनी घेतली आणि इंझोरी परिसरातील गुरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या कोंडोली येथील पशू वैद्यकीय दवाखान्याच्या पशूधन पर्यवेक्षकांना लसीकरण राबविण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार पशूधन पर्यवेक्षकांनी लसीकरण मोहिमेची तयारीही केली.  परंतु या कामासाठी त्या स्वत: न येता त्यांनी चक्क खाजगी व्यक्तींना पाठविले. या व्यक्तीने गावात फिरुन गुरांना आजार प्रतिबंधक लसही दिली. शासकीय कर्मचारी जबाबदारी सोडून खाजगी व्यक्तींचा आधार घेण्याचा हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.  (वार्ताहर)

शूधन विकास अधिकाºयांच्या सुचनेनंतर इंझोरीसह परिसरातील गुरांवर लसीकरण मोहिम राबविण्यासाठी काही लोकांना पाठविले होते. तेथे गुरांवर योग्यरित्या लसीकरण करण्यात आले व इतर उपचारही करण्यात आले आहेत. -डॉ. किरण जाधव, पशूधन पर्यवेक्षक, कोंडोली (मानोरा)

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा