शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:51 IST

MSEDCL News ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी इसमांचा वापर केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वीज देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी इसमांचा वापर केला जात आहे. वीजपुरवठा खंडीत करताना एखाद्यावेळी अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जवळपास ६० कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. थकीत देयकाचा भरणा करण्याच्या सूचना महावितरणतर्फे वारंवार ग्राहकांना देण्यात आल्या. दरम्यान, कोरोनाकाळातील थकीत देयक माफ किंवा कमी होण्याच्या चर्चेमुळे ग्रामीण भागात अनेकांनी देयकाचा भरणा केला नाही. त्यामुळे थकीत देयकाचा आकडा चांगलाच फुगला आहे. थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी महावितरणने सर्वत्र मोहीम हाती घेतली असून, वारंवार सूचना करूनही देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईनमनऐवजी खासगी व्यक्तींना हाताशी धरून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही विद्युत बिघाड दुरुस्त करण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर केला जात असल्याचे समोर आले होते. यामध्ये कारंजा तालुक्यात एका जणाला जीवही गमवाला लागला होता. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याकरिता खासगी व्यक्तींचा वापर करणाऱ्यांविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. 

९४७ जणांचा वीजपुरवठा खंडीतजिल्ह्यात घरगुती वीज वापर करणाऱ्या ७२ हजार २०० ग्राहकांकडे ४६ कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. यांसह १६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ९६ लाख आणि ५ हजार ७२० वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या जवळपास ९४७ जणांचा वीजपुरवठा आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे.

 

थकीत वीज देयके वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. लाईनमन किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीच वीजपुरवठा खंडित करणे अनिवार्य आहे. खासगी इसम हा वीजपुरवठा खंडित करीत असेल तर ही बाब गंभीर असून, याप्रकरणी चौकशी केली जाईल तसेच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी व्यक्तींचा कुणीही वापर करू नये, अशा सूचना दिल्या जातील.                - आर.जी. तायडे कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम