शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वाचविण्यासाठी संक्रातिच्या सुगड्यांचा वापर     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:45 IST

वाशीम: सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क                  वाशीम: मकरसंक्रात व सुगडी  यांचे अतूट नाते आहे . मकर संक्रातीला सुवासिनींना सुगड्यांचे वाण देऊन हा सण साजरा केला जातो . पूर्वी ह्या  सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पाण्यासाठी केला जायचा .परंतु आजच्या आधुनिक व यंत्र युगात घरोघरी फ्रिज ,रेफ्रिजेटरचा वापर वाढल्यामुळे हे सुगडे दुर्लक्षित झाले आहे . परंतु याच सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे.  तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.    या अभिनव संकल्पनेतुन सुगड्यांना झाडांच्या बुंध्यापाशी एका फुटावर खड्डा करून त्यात सुगडे ठेवल्यास व त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्याची वात लावली की सुगड्यात भरलेली पाणी वृक्षांना सलाईन सारखे काम करते . सुगडयातील भरलेले पाणी जवळपास झाडांना दोन ते तीन दिवस सहज पुरते . आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास नव्वद टक्के बाष्पीभवन होते , परंतु या पद्धतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळूहळू झिरपत जाउन झाडांच्या मुळांना उपयोगी पडते .                        वरील उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी  व शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व राष्ट्रीय हरीत सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMakar Sankrantiमकर संक्रांतीNatureनिसर्ग