शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबे पिकविण्याकरिता होतोय ‘केमिकल्स’चा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 15:27 IST

वाशिम : परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून कच्चा स्वरूपात आणले जाणारे आंबे रासायनिक प्रक्रिया करून पिकविली जात आहेत.

ठळक मुद्दे चुकीच्या पद्धतीने पिकविल्या जाणारे असे आंबे सेवनात आल्यामुळे विविध स्वरूपातील पोटाचे विकार जडू शकतात. ‘कोल्ड हाऊस’मध्ये कच्चा आंब्यांवर रासायनिक प्रक्रिया करून आंबे रातोरात पिकविली जातात आणि दुसºया दिवशी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात.

वाशिम : परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून कच्चा स्वरूपात आणले जाणारे आंबे रासायनिक प्रक्रिया करून पिकविली जात आहेत. असे आंबे सद्या जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये सर्रास विक्रीला उपलब्ध असून प्रशासकीय विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात सापडल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. केसर, दशहरी, लालबाग, बादाम आदी प्रजातींच्या आंब्याची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. संबंधित व्यावसायिकांकडून दररोज पिकलेले आंबे बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करणे कसे शक्य आहे, याबाबत चौकशी केली असता, शहराच्या बाहेर काही ठराविक ठिकाणी थाटण्यात आलेल्या ‘कोल्ड हाऊस’मध्ये कच्चा आंब्यांवर रासायनिक प्रक्रिया करून आंबे रातोरात पिकविली जातात आणि दुसºया दिवशी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, चुकीच्या पद्धतीने पिकविल्या जाणारे असे आंबे सेवनात आल्यामुळे विविध स्वरूपातील पोटाचे विकार जडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करित असताना शहानिशा करूनच पुढचे पाऊल उचलावे, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. 

आंब्याची चव झाली आंबट!पुर्वी गवतात ठेवून पारंपरिक पद्धतीने गावरान आंबे पिकविले जायचे. यंदा मात्र ग्रामीण भागात गावरान आंबा पिकलाच नाही. असे असताना इतर प्रजातीचे आंबे डाले आणि त्यात गवत ठेवून पिकविण्यात आल्याचे भासवून त्याची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार बाजारात दिसून येत आहे. असे आंबे घरी नेऊन त्याचा रस केल्यास तो चवीला अत्यंत आंबट निघत असल्याचा अनुभव काही नागरिकांनी कथन केला. 

टॅग्स :washimवाशिमMangoआंबा