शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गीक कृत्य : आरोपी युवकास १० वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:43 IST

आरोपी शंकर दिलीप धबडघाव या २० वर्षीय युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तहेरा यांनी मंगळवारी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गीक कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळुन आलेल्या मालेगाव येथील आरोपी शंकर दिलीप धबडघाव या २० वर्षीय युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तहेरा यांनी मंगळवारी सुनावली.मालेगाव येथील मुंगसाजी परिसरात राहणाऱ्या पिडीत अल्पवयीन मुलाच्या आजीने सदर घटनेची फिर्याद दिली होती. आपल्या अल्पवयीन नातवास आरोपी शंकर धबडघाव याने २५ मे २०१८ रोजी दुपारी २ वाजता आपल्या अल्पवयीन नातवास चल आपण बाहेर जावू असे सांगुन लगतच्या मंदिराजवळील झोपडीत नेवुन त्याच्यासोबत अनैसर्गीक कृत्य केले व याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यावर सदर घटनेची माहिती नातवाने दिली, असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शंकर याचे विरुध्द कलम ३७७ ,५०४, ५०६, भादंवी तसेच पोक्सो अंतर्गत कलम ४, ५ एम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कमलेश खंडारे यांनी तपास पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. विद्यमान न्यायालयाने या प्रकरणात एकुण सहा साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. तहेरा यांनी आरोपी शंकर धबडघाव यास कलम ३७७ अंतर्गत १० वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच कलम ४ पोक्सो अंतर्गत ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक महिने सश्रम कारावास तर पोक्सो कलम ६ मध्ये १० वर्ष सश्रम कारावासाची व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सदर तिन्ही शिक्षा आरोपीस एकत्रीतरित्या भोगावयाचे आहे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी सहाय्यक अभियोक्ता अ‍ॅड. माधुरी मिसर यांनी बाजु मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणुन केशव इरतकर यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय