शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:29 IST

वाकद :  देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या वाकद येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.

ठळक मुद्देवाकद येथील धनंजय भगवानराव देशमुख हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ३० सप्टेंबर रोजी ते नाशिक येथे सेवानिवृत्त झाले. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावकºयांच्यावतीने झालेला अनोखा सत्कार पाहून धनंजय देशमुख भारावून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाकद :  देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या वाकद येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. २ आॅक्टोबर रोजी हा स्वागत समारोह झाला असून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.वाकद येथील धनंजय भगवानराव देशमुख हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ३० सप्टेंबर रोजी ते नाशिक येथे सेवानिवृत्त झाले. २ आॅक्टोबर रोजी ते आपल्या मूळ गावी वाकद येथे येणार असल्याने गावकºयांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. वाकद येथील बसस्थानकावर आगमन होताच शिवम मित्र मंडळ, शिवाजी विद्यालय वाकद,गावातील नागरीक, व्यावसायीक, शाळा ,महाविद्यालय ग्रा.पं.कार्यालय, विविध  संघटना,अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत केले. तेथुन ढोल, ताशे व बँड पथकाच्या गजरात राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. गल्लोगल्ली गावातील महिलांनी रांगोळी काढुन औक्षण करीत स्वागत केले. याच कार्यक्रमादरम्यान देशमुख परिवार वाकदच्यावतीने वाकद व परिसरातील आजी माजी सैनिकांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक संपत जमधाडे, पांडूरंग लाटे, नारायण मोरे, प्रकाश लाटे, वामन अंभोरे, चंद्रपालसिंह ठाकुर, अशोकराव देशमुख, सलमातखॉ, पठाण, प्रल्हाद बोरकर, बळीराम गांधीले, आजी सैनिक लखन चोपडे, पंजाबराव देशमुख, केंद्रेकर, यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.अभिजीत देशमुख यांनी केले. गावकºयांच्यावतीने झालेला अनोखा सत्कार पाहून धनंजय देशमुख भारावून गेले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरचे  माझे जीवन  गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करीन, असे सांगितले.  कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन ह.भ.प.अशोक अस्तरकर यांनी तर आभार प्रा.संजय देशमुख यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिम