शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत

By admin | Updated: May 16, 2017 01:40 IST

मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले.मालेगाव येथील बाजार समितीच्या ओट्यावर इतरत्र मोकळी पडलेली तूर शनिवारच्या अवकाळी पावसामुळे ओली झाली होती. ओली झालेली ही तूर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत वाद झाला. त्यामुळे शनिवारी येथील खरेदी बंद पडली. दोन दिवस शेतकऱ्यांना तूर मोजणीची प्रतिक्षा करावी लागली. सोमवारपासून तूर मोजणीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीने मंडप व थंडपाण्याची व्यवस्था केली. सोमवारी मालेगाव बाजार समिती परिसरातील नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. सकाळपासूनच शेतकरी वाहनासह बाजार समितीत दाखल झाले. टोकन व नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर मोजणी करण्यात आली. तसेच टोकन मिळविण्यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांची रांग लागली होती. उन्हापासून बचाव म्हणून बाजार समितीने टाकलेल्या मंडपातच नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी फराळ व चहा, पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली. सुट्टीच्या दिवशीही खरेदी केली जाणार आहे. आजपर्यंत २० हजार क्विंटलची तूर खरेदी करण्यात आली, असे बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिकोनातून आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सभापती बबनराव चोपडे, उपसभापती प्रकाश पाटील अंभोरे, सचिव प्रकाश काढणे व कर्मचाऱ्यांनी दिली. मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडप, फराळ व थंडपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टोकन मिळविलेल्या शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी केली जात आहे. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. - बबनराव चोपडे, सभापती, बाजार समिती मालेगाव.--