शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस ते कल्याण बससेवा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:23 IST

२०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव  यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.

ठळक मुद्देदिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आलीपोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता पूर्ववत सुरु करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: २०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव  यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र  पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम हे जगप्रसिध्द तिर्थक्षेत्र  असुन संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी सामकीमाता यांचे समाधीस्थळ असून या काशीत वर्षभर भाविक भक्तांची वर्दळ असते. रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत भारत भरातील भाविक समाधीस्थळी माथा टेकण्यासाठी या पावन भुमीत येतात. या काशीत राज्यभरातील भाविकांना आंधप्रदेश,  कर्नाटक या राज्याची एस.टी. महामंडळाची बस चालु असुन महाराष्ट्र एस.टी. महामंडळाची  दिग्रस ते कल्याण ही बस सेवा  २०१५ पासून सुरु होती.परंतु मागील सहा महिन्यापासून ही बस सेवा अचानकपणे  बंद केली असुन ही बस  पुर्ववत सुरु करुन  या बसचा दिशा भूमीच्या धर्तीवर पोहरागड एक्सप्रेस नामकरण  करुन ती बस पुर्ववत सुरु करुन भाविकाची होणारी परवड थांबवुन न्याय द्यावा. एस.टी.महामंडळ कडुन रोज रोज नवनवीन  व वाताणुकुलीत बस तयार करुन  सुखाचा  प्रवास एस.टी. चा  प्रवास हे ब्रिद घेवुन गाव तिथे एस.टी. बस पोहचविण्याचा  संकल्प महामंडळ करीत असतांना  मुंबई, पुणे,  औरंगाबाद सह मुंबई परिसरातील गोरगरीब जनतेला सुलभ प्रवास देणारी  कल्याण येथुन सकाळी ७ वाजता निघणारी बस दिग्रस येथे पोहरादेवी वरुन दिग्रस येथे रात्री ११ वाजता तर द्रिगस येथुन  सकाळी ७ वाजता निघुन कल्याण मुंबई येथे रात्री ११ वाजता पोहोचणारी बस अचानकपणे बंद झाल्याने भाविकांच्या सेवेत पुर्ववत सुरु करुन या बस सेवेचा पोहरागड एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ.शाम जाधव,    माजी शहर प्रमुख मनोहर राठोड ,  े  शिवसैनिक प्रा.ओम बलोदे ,  सर्कल प्रमुख नंदु चौधरी पाटील,  सुनिल जाधव,  संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.