वाशिम, दि. ३१- बीएस-३ मानकांप्रमाणे उत्पादीत वाहने यापुढे विक्री करता येणार नसल्याने गत दोन दिवसात दुचाकी कंपन्यांनी भारी डिस्काऊंट देत वाहन विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे अवघ्या एका दिवसांत सर्वच प्रकारच्या वाहनांचा स्टॉक संपला असून, शुक्रवारी दुपारी २ वाजताच जिल्ह्यातील ह्यशो-रूमह्ण बंद झाल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली.सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानकांप्रमाणे उत्पादीत वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने सर्वच वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारातील वाहनांचा साठा मोठय़ा प्रमाणात असल्याने संबंधित वाहनांवर कंपन्यांकडून २0 ते ३0 टक्के सवलत देण्यात आली. दरम्यान, ही वार्ता वाशिम जिल्ह्यात पसरताच बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असणारे सर्वच शो-रूम वाहन खरेदी करणार्यांसाठी ३0 मार्चला रात्री उशिरापर्यंंत सुरू होते. त्यामुळे या प्रकारातील वाहनांचा स्टॉक संपल्यामुळे ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच शो-रूमचे शटर बंद झाल्याचे पाहावयास मिळाले. वाहनांच्या इंजिनमुळे होणार्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. बीएस-४ हे कमीत कमी वायू प्रदूषण करणारे असून, त्यामुळे हे इंजिन वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांनी एकच धावपळ केली. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदी-विक्री होऊ शकणार नाही. हे पाहता वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर सवलत दिली आहे. ३१ मार्चपयर्ंतच ही सवलत असेल. त्यात होण्डा, टीव्हीएस, महिंद्रा आदी कंपन्यांचा समावेश आहे. होण्डाच्या दुचाकींवर पाच हजारांपासून ते १२ हजारापयर्ंत; तर टीव्हीएसच्या वाहन खरेदीवर १५ हजार ते २0 हजारापयर्ंत सवलत देण्यात आली होती. त्यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली. गुरूवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यातील सर्वच वाहनांच्या शो-रूमवर वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. शुक्रवारी मात्र दुपारी १२ पर्यंंतच शो-रूम सुरू ठेवून त्यानंतर बंद करण्यात आले. दोन दिवसांत ८२५ दुचाकी वाहनांची विक्री!बीएस-३ मानकांप्रमाणे उत्पादित वाहने कायमची बंद होणार असल्याने धास्तावलेल्या कंपन्यांनी वाहनांचे दर अगदीच कमी करून त्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांनी विविध वाहनांच्या शो-रूमवर तोबा गर्दी केली. यायोगे गेल्या दोन दिवसांत तब्बल ८२५ दुचाकींची विक्री झाली. यात प्रामुख्याने बजाज-२५, हीरो-३५0, होण्डा-१५0, टीव्हीएस-२७, यामाहा-९0, सुझूकी-८0 आदी कंपन्यांच्या दुचाक्यांचा समावेश आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे ७00 वाहनांची नोंद!भारी डिस्काऊंट मिळाल्यामुळे एकीकडे विविध वाहनांच्या शो-रूममधून गाडी विक्रीचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे वाशिमचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील वाहनधारकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. १ एप्रिलपूर्वी सदर वाहनांचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसांच्या काळात तब्बल ७00 वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुचाकींचा ‘स्टॉक’ संपला!
By admin | Updated: April 1, 2017 02:41 IST