शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूरवरून तिवळी या गावी दुचाकी वाहनाने जात असताना पाठीमागे बसलेल्या महिलेची साडी अचानकपणे वाहनाच्या मागच्या चाकात अडकल्याने अपघात झाला. यात पती-पत्नी दोेघेही जखमी झाले. ही घटना ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, तिवळी येथील जगदीश लोखंडे व मनिषा लोखंडे हे दाम्पत्य काही कामानिमित्त ५ मार्च रोजी शिरपूर येथे आले होते. दरम्यान, काम आटोपून एम.एच. १५ पी ५१०८ या क्रमांकाच्या दुचाकीने ते परत तिवळी येथे जात असताना पाठीमागे बसून असलेल्या मनिषा लोखंडे यांच्या साडीचा पदर चालत्या दुचाकीच्या चाकात अडकून गुंडाळला गेला. यामुळे जगदीश लोखंडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उलटली. यात लोखंडे दाम्पत्य जखमी झाले. दुधाळा येथील आॅटोचालक कैलास काळे यांनी दोघांनाही उपचारासाठी शिरपूरच्या एका खासगी दवाखान्यात दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांत नोंद झालेली नव्हती.
दुचाकीच्या चाकात साडी अडकून अपघात; पती-पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:47 IST
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूरवरून तिवळी या गावी दुचाकी वाहनाने जात असताना पाठीमागे बसलेल्या महिलेची साडी अचानकपणे वाहनाच्या मागच्या चाकात अडकल्याने अपघात झाला.
दुचाकीच्या चाकात साडी अडकून अपघात; पती-पत्नी जखमी
ठळक मुद्दे ही घटना ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. जगदीश लोखंडे व मनिषा लोखंडे हे दाम्पत्य काही कामानिमित्त ५ मार्च रोजी शिरपूर येथे आले होते. जगदीश लोखंडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उलटली. यात लोखंडे दाम्पत्य जखमी झाले.