वाशिम: तालुक्यातील काटा येथे जुन्या वैमनस्यामधून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तिघांना गंभीर जखमा झाल्या. ही घटना २२ डिसेंबरला सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास घडली असून, ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परांच्या तक्रारीहून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. काटा (ता.जि.वाशिम) येथील सुरेश गुलाबराव देशमुख यांना आमच्या विरुद्ध खोटा रिपोर्ट का दिला, असे कारण समोर करून नितीन प्रकाश इंगोले, धनंजय प्रकाश इंगोले, प्रकाश रायभान इंगोले या तिघांनी संगनमत करून काठय़ाने डोक्यावर व पायावर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सुरेश देशमुख जखमी झाले. देशमुख यांच्या फिर्यादीहून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसर्या गटाकडून धनंजय प्रकाश इंगोले यांनी फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, सुरेश देशमुख यांनी आमच्यावर असलेली कोर्टातील केस मागे का घेत नाही, असे कारण समोर करून चाकूचे वार करून जखमी केले. या सर्व जखमींची येथील जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी करून उपचार करण्यात आले. पोलिसांनी सुरेश देशमुख यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार राठोड करीत आहेत.
जुन्या वैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी
By admin | Updated: December 23, 2015 02:31 IST