भर जहॉगीर (वाशिम) : भरजहॉगीर परिसरातील मोहगव्हाणवाडीनजिकच्या वाडी शिवारात वीज पडून दोन मजूर ठार झाल्याची घटना शनिवार, ३ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. संतोष निवृत्ती गरकळ (वय ३० वर्षे) आणि विजय वसंता गरकळ (वय १६ वर्षे, दोघेही रा.देऊळगाव वापसा, ता.लोणार जि.बुलडाणा) येथील रहिवासी होते. याबाबत सविस्तर वृत्त असे, की वाडी शिवारातील राजू गोविंदा गरकळ यांच्या शेतामध्ये वेळूच्या झाडाच्या कटाईसाठी आलेले संतोष आणि विजय हे दोघे काम करित असताना त्यांच्या अंगावर अचानक आकाशातून चकाकत आलेली वीज कोसळली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच शेतशिवारामध्ये काम करत असणाऱ्या इतर लोकांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांनाही ट्रॅक्टरमध्ये टाकून भरजहॉगीर येथील बसथांब्यापर्यंत आणले व नंतर गावकऱ्यांनी खासगी वाहनाने त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉ.प्रशांत पवार यांनी दोघांनाही अधिकृतरित्या मृतक घोषीत केले.
वीज पडून दोन ठार!
By admin | Updated: June 4, 2017 05:38 IST