मंगरुळपीर , दि. १५-: नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील तर्हाळानजीक दुचाकी व कारच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. गणेश इंगळे रा. जळगाव जामोद, जि. बुलडाणा आणि बंडू पवार, रा. पेडगाव अशी जखमींची नावे आहेत. नागपूर ते औरंगाबाद या द्रूतगती मार्गावरून गणेश इंगळे हे कारने जात असताना, तर्हाळानजीक बंडू पवार यांच्या दुचाकीला कारची धडक बसली. यामध्ये गणेश इंगळे आणि बंडू पवार हे दोघेही जखमी झाले. पेडगाव येथील त्रिनेत्री विद्यालयात पवार हे लिपिक आहेत. या अपघातात पवार यांचा एक पाय निकामी झाला. कारचालक गणेश इंगळे यांच्या अंगावर कार पडल्याने तेसुद्धा गंभीर जखमी आहेत. सर्वप्रथम तर्हाळा येथील रणजित गावंडे यांच्या सहकार्याने शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जखमींना अकोला येथे हलविण्यात आले.
दुचाकी-कारच्या अपघातात दोन जखमी
By admin | Updated: September 16, 2016 03:05 IST