शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

वाशिम येथे शनिवारपासून दोन दिवसीय कथालेखन, कवितालेखन कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:47 IST

वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे. 

ठळक मुद्दे सदर कार्यशाळा ही इयत्ता आठवी ते बारावी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस एस. एम. सी. शिक्षण संकुल परिसरात सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ही कार्यशाळा होईल.कथालेखन व कविता लेखन करताना घ्यावयाची काळजी, मराठी व्याकरण यासह अन्य बारकावे विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले जाणार आहेत. 

वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे. 

मराठी वाङमय, साहित्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळा ही इयत्ता आठवी ते बारावी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. कथालेखन व कविता लेखन करताना घ्यावयाची काळजी, मराठी व्याकरण यासह अन्य बारकावे विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले जाणार आहेत.  साहित्य क्षेत्राची ओळख करून देण्याबरोबरच साहित्य क्षेत्राशी विद्यार्थी अधिकाधिक संख्येने कशी जुळतील, याकडेही लक्ष देणार आहे.

शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस एस. एम. सी. शिक्षण संकुल परिसरात सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत ज्येष्ठ कथालेखक बाबाराव मुसळे आणि पांडुरंग मोरे, कवी मोहन शिरसाट, प्रा. सुनिता अवचार, प्रा. गजानन वाघ, डॉ. विजय काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमliteratureसाहित्य