धनंजय कपाले /वाशिमआरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परताव्याचे १.९0 कोटी रुपये शासनाकडे थकीत असून, ३१ मार्चपर्यंंंंत परतावा न मिळाल्यास एकही इंग्रजी शाळा मोफत प्रवेश देणार नसल्याचा इशारा वाशिम जिल्ह्यातील ह्यमेस्टाह्ण संघटनेने दिला आहे. इंग्रजी शाळांमध्ये आरटीइ अंतर्गत मोफत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा मागील चार वर्षांंंंचा परतावा शासकडे अद्याप थकीत आहे. अनेक आंदोलनानंतर शासनाने सन २0११-१२ या वर्षाचे पैसे शाळांना दिले. मात्र, दोन वर्षाचे तब्बल १.९0 कोटी रुपये शासनाकडे अद्यापही बाकी आहेत. शासनाने आरटीई प्रवेशाची थकबाकी ३१ मार्चपयर्ंत द्यावी, अशी भूमिका इंग्रजी शाळांनी घेतली आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार २00९ प्रमाणे वाशिम जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांनी यापूर्वी २५ टक्के प्रमाणे प्रवेश दिलेला आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन इंग्रजी शाळा करीत आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान इंग्रजी शाळांना मिळत नाही. विद्यार्थ्यांंंंच्या शैक्षणिक शुल्कातून या शाळा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करतात. या शाळांद्वारे उच्च शैक्षणीक दर्जा राखला जात आहे. असे असतानाही शासन त्यांनी तयार केलेल्या नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांंंंची फीस देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी शाळा या शासनाच्या नियमाप्रमाणे २५ टक्के मोफत प्रवेश देण्यास असर्मथतता दर्शवित असल्याची बाब समोर येत आहे. शासन इंग्रजी शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे शुल्क शाळांना देत नसल्याचा फटका पालकांना बसणार आहे.
शिक्षण संस्थांची शासनाकडे दोन कोटींची थकबाकी!
By admin | Updated: March 17, 2016 02:22 IST