शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणात अडीच लाख रुपये हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

शिरपूर जैन : पांगरखेडा येथे जालना जिल्ह्यातील गणेश बोराडे यांच्या जवळील सोळा लाख रुपये लुटल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी ...

शिरपूर जैन : पांगरखेडा येथे जालना जिल्ह्यातील गणेश बोराडे यांच्या जवळील सोळा लाख रुपये लुटल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजेंद्र चव्हाण या आरोपीकडून रोख अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी बुधवारी हस्तगत केला. या प्रकरणातील साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल येऊन फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

१५ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील बोद्री येथील गणेश बोराडे यांना पोकलेन मशीन विकत घेण्यासाठी आरोपींनी पांगरखेडा येथे बोलविले. तेथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गाडीत ठेवलेले सोळा लाख रुपये व मोबाइल जबरीने लुटला. याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नरेंद्र गयानू चव्हाणश विजेंद्र नरेंद्र चव्हाण व एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. नरेंद्र चव्हाण, विजेंद्र चव्हाण या आरोपींना पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, नव्याने जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक व चमूने आरोपी विजेंद्र याच्याकडून अडीच लाख रुपये रोख व वीस हजार रुपयांचा मोबाइल व एक चाकू जप्त केला.

.......

बुलडाणा जिल्ह्यातून पथक खाली हात परतले

फरार आरोपी बादल शिका चव्हाण, नरेंद्र गयानू चव्हाण व एक अनोळखी आरोपी यांच्या शोधार्थ एक पोलीस पथक बुलडणा जिल्ह्यात रवाना झाले होते. मात्र, आरोपी मिळून न आल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले. घटनेतील तीन आरोपी साडेतेरा लाख रुपये घेऊन अद्यापही फरारच आहेत. फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी सांगितले.