शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी रुपये कर थकीत; शहराचा विकास खुंटला

By admin | Updated: August 15, 2015 00:32 IST

६00 थकबाकीदारांना नोटीस; कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत.

मालेगाव (जि. वाशिम): यापूर्वी ग्रामपंचायत असणार्‍या मालेगाव शहराचा नगर पंचायत झाल्यावर विकास होईल, अशी मालेगावकरांची बर्‍याच दिवसांपासून धारणा होती. ग्रा.पं.चे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले; मात्र शहराच्या विकासाला निधीअभावी ब्रेक लागत आहे. त्यातही थकित असलेला दोन कोटीच्या वर करामुळे शहर विकासाला खीळ लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यापूर्वी मालेगावला ग्रामपंचायतीचा दर्जा होता. गाव विकासाचे राजकारण व अंतर्गत हितसंबंध यामुळे टॅक्स वसुली पाहिजे त्या जोमाने केल्या जात नव्हती. पर्यायाने जेमतेम टॅक्स वसुली व काही थोड्याफार निधीच्या भरवशावर शहराचा कारभार चालत होता. त्यामध्ये शहराच्या मूलभूत सुविधा, कर्मचार्‍यांचे पगार केल्या जात होते. त्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सुविधा नागरिकांना मिळत होत्या. नागरिकांना आवश्यक सुविधा म्हणजे स्वच्छ व चांगले रस्ते, वीज, पाणी व साफसफाई यांच्यामध्ये नगर पंचायत झाल्यावर बदल होईल व लोकांना सुखसुविधा मिळतील, अशी लोकांना अपेक्षा होती; मात्र नगर विकास मंत्रालयाच्या आदेशान्वये येथे नगर पंचायत झाली; मात्र निधीअभावी विकासाला खीळ बसलेली आहे. शासनाने नगरपंचायतची घोषणा केली; मात्र येथे निधी पुरविला नसल्याने शहरात काही बदल झाला नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतीचाही निधी शिल्लक नाही व शहरातील लोकांचे कर वसुलीही नसल्याने विकास कसा करणार, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आला आहे. मालेगाव शहरातील सुमारे अडीच कोटीच्यावर कर थकित आहे. शासकीय कार्यालयासह अनेक धनाढय़ लोकांकडे टॅक्स थकित आहे. शासकीय कार्यालयामध्ये भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल), वीज वितरण कंपनी, सोसायटी, लघुपाटबंधारे बांधकाम विभाग, बालाजी फॅक्ट्री, मोबाइल टॉवर, तहसील कार्यालय, युनिटी टेलिकॉम, उदरु शाळा यांसह माहेश्‍वरी भवन आदी कडे मोठय़ा संख्येने कर थकित आहे. यासह लाख रुपयाच्यावर कर थकित असणारे २0 ते २५ नागरिक आहेत. तर १0 हजाराच्या आत थकित व २0 हजाराच्या आत थकित असणारे ५0 ते १00 नागरिक आहेत. या सर्वांकडील कर वसुलीची मोहीम प्रशासनाकडून घेण्यात आली असून, त्यापैकी प्राथमिक टप्प्यात मोठे थकबाकीसह ६00 जणांना नोटिसा दिल्या आहेत. बाकिच्यांना नोटीसा देणे सुरु आहे. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या सर्वांच्या जवळचा अडीच कोटी रुपये टॅक्स जमा केल्यास शहराच्या विकासाला हातभार लागू शकतो.