शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संत्रा उत्पादक अडचणीत

By admin | Updated: August 13, 2015 01:13 IST

मृगबहाराला फटका; नुकसानभरपाईची शेतक-यांची मागणी.

वाशिम/मूंगळा : मृगबहार गळून पडल्याने मुंगळा परिसरासह जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पारंपारिक शेती परवडत नसल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. जिल्ह्यात ९00 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. एकट्या मुंगळा परिसरात ३00 हेक्टरवर संत्रा लागवड आहे. २८ जूननंतर १ ऑगस्टपर्यंत पावसाने दडी मारल्याने याचा फटका संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात बसला आहे. यावर्षी मृगनक्षत्रात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने संत्रा उत्पादन समाधानकारक होईल अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने संत्रा बागेतील बहार गळून पडला. पावसाची दडी आणि ३५ ते ३९ सेल्सीअस तापमान यामुळे संत्र्याच्या मृगबहाराला फटका बसला. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. या परिसरात जवळपास ३00 हेक्टरवर संत्रा फळबाग बहरली आहे. मागील एक महिन्यात पाऊस नसल्याने मृगबहाराला फटका बसला. या प्रकरणी नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुंगळा येथील जगदंबा संत्रा उत्पादक शेतकरी स्वयसहाय्यता गटाचे शेतकरी व अन्य शेतकर्‍यांनी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, कृषी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, आमदार अमीत झनक, आदींना यापूर्वी निवेदन दिले आहे. मात्र, यावर अद्याप काहीच कार्यवाही नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २ लाख रुपये मदत देण्याची मागणी मुंगळा येथील जगदंबा संत्रा उत्पादक शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष प्रकाश राऊत, माजी पं.स.सभापती उध्दवराव केळे, संत्रा उत्पादक शेतकरी आनंद नाईक, गणेश मोहळे, भागवत मोहळे, भागवत राऊत, अशोक राऊत, पिंटू राऊत, बबन भांदूर्गे, सुरेश राऊत आदींनी मंगळवारी केली.