मालेगाव (जि. वाशिम) : मेहकरवरून मालेगावकडे येणार्या ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडी चालक व बैल जखमी झाले. ही घटना ५ जुलै रोजी मेहकर-मालेगाव मार्गावरील मुंगळा फाट्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. डोंगरकिन्ही येथील शेतकरी गजानन दत्तात्रय देशमुख हे सायंकाळच्या सुमारास शेतातून घरी येत असताना, एम.एच.१६ क्यू ४२४८ क्रमांकाच्या ट्रकने बैलगाडीला धडक दिली. यामध्ये देशमुख जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ट्रकने बैलगाडीला उडविले
By admin | Updated: July 6, 2015 02:11 IST