शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:38 IST

३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून १ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत ३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित सव्वा पाच लाख वृक्षांची ३० सप्टेंबरपर्यंत लागवड करावी लागणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.शासनाच्या वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निश्चित केले असून याअंतर्गत १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड योजना सर्वत्र पार पडली; तर १ जुलै २०१९ पासून वृक्षलागवडीच्या तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करावे लागणार असून ३ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ३७ लाख ७५ हजार वृक्ष प्रत्यक्षात लावण्यात आली आहेत. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण यासह जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती, चार नगर पालिका, दोन नगर परिषदा, शाळा-महाविद्यालये व प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे देखील विशेष लक्ष पुरविले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग