शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वाशिम जिल्ह्यात १0७१ क्षय रूग्णांवर उपचार

By admin | Updated: March 24, 2015 00:41 IST

वाशिम जिल्ह्यात २0४४ डॉटस उपचार केंद्राव्दारे क्षय रूग्णांची तपासणी.

वाशिम :क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने पावले उचलली असून वेळोवेळी जनजागृती करून यावर आळा घालण्यात येत आहे. जिल्हयात २0४४ डॉटस प्रोव्हायडरव्दारे रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत जिल्हयात १0७१ क्षयरोग्यांवर उपचार करण्यात आले असून यापैकी ८७२ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्हयात २00३ पासून २0४४ डॉटस उपचार केंद्रेसुरु करण्यात आली होती आजच्या स्थितीला २0४४ केंद्रात डॉटस पद्धतीव्दारे संबंधित कर्मचार्‍यांच्या देखरेखीत रुग्णांना औषधे घ्यायला लावली जातात. या २0४४ केंद्रात जिल्हा सामान्य रुग्णालय, सात ग्रामीण रुग्णालये, २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५३ आरोग्य उपकेंद्रे, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक व आरोग्यसेविका १७६८ व ४0 खासगी वैद्यकीय व्यावसायीक असे एकूण २0४४ डॉटस केंद्राचा समावेश आहे. नवीन रुग्णांवर डॉटसचा सहा महिनेपर्यंंत उपचार केला जातो. जुन्या रुग्णांवर आठ महिनेपर्यंंत उपचार केले जातात. एमडीआर टीबी असणार्‍या रुग्णांना प्रथम अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यायात सात दिवसापर्यंंत भरती करुन उपचार केले जातात नंतर २४ महिनेपर्यंंत डॉटसकेंद्रात उपचार केले जातात. सप्टेंबर २00९ पासून जिल्हयात डॉटस प्लस औषधोपचारास सुरूवात झाली आहे. जे रूग्ण डॉटस या औषध प्रचार प्रणालीमध्ये औषधोपचाराला दाद देत नाहीत अशा रूग्णांवर डॉटस प्लस उपचार औषधोपचार दिला जातो. २४ मार्च रोजी निघणार्‍या रॅलीला मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाला सुरूवात करतील. यात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन रूचेश जयवंशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आर. एच. खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, डॉ. एम.एस. बायस, डॉ. अनिल कावरखे, डॉ. जिरवणकर , आरोग्य विभागाची चमू यांच्यावतिने करण्यात आले आहे. तसेच क्षयरोग जनजागण मोहीम जिल्हयात राबविण्यात येत असून २१ मार्चपासून सुरूवात मोहीमेच्या उदघाटनाने करण्यात आली आहे. यानिमित्ताने २४ मार्च रोजी जनजागरण रॅली निघणार आहे. जनजागरण मोहीमेंतर्गंंत जिल्हयात २३ मार्च ते २८ मार्चपर्यंंत विविध ठिकाणी क्षयरोग निदान शिबीरे व जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये अनसिंग येथील ग्रामीण रूग्णालयात २३ मार्च रोजी क्षयरोग निदान शिबीर घेण्यात आले. २४ मार्चला वाशिम येथील सामान्य रूग्णालय, २५ मार्चला रिसोड, मानोरा व मंगरूळपीर , २६ मार्चला कारंजा ग्रामीण रूग्णालय, २७ मार्चला मालेगाव ग्रामीण रूग्णालय व २८ मार्चला कामरगाव ग्रामीण रूग्णालयात क्षयरोग उपचार पथक व सुक्ष्म दर्शक केंद्राव्दारे जनजागरण व शिबीरे घेण्यात येणार आहेत.