शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पदवी नसतानाही अनेकजण करताहेत पशूंवर उपचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:59 IST

रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशु पर्यवेक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे वाकद येथील प्रकाश प्रभाकर हरिमकर यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांकडे तसेच पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली. परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले. पशुसंवर्धन दवाखान्यात परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां त्या तत्कालिन कर्मचाऱ्याला पशूंवर उपचार न करण्याची ताकीद दिली आहे.

- निनाद देशमुख

रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशु पर्यवेक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळत आहेत. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात पशुचिकित्सा केंद्र, दवाखाने आणि मनुष्यबळ नसल्याचे पाहून काही जण पशुवैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतानादेखील पशुंवर उपचार करतात. पशुसंवर्धन केंद्रातील काही परिचरही पशुंवर वैद्यकीय उपचार करतात, अशा तक्रारी पशूसंवर्धन विभागाला प्राप्त होत आहेत. वाकद येथील प्रकाश प्रभाकर हरिमकर यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांकडे तसेच पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली असून,  वाकद पशुसंवर्धन दवाखान्यात परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले. काही महिन्यांपूर्वी सदर परिचर कर्मचाऱ्याची रिसोड पंचायत समिती येथे कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती झाली. तथापि, ते वाकद परिसरात पशूंवर उपचार करतात. त्यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने जनावराचा मृत्यू झाल्याने ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी, यासाठी हरिमकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्यापही भरपाई मिळाली नाही, असे तक्रारीत नमूद आहे.  या तक्रारीची दखल घेत पशूसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशूधन पर्यवेक्षकांना सूचना दिल्या की, आपल्या कार्यक्षेत्रात पदवी नसतानाही कुणी पशूंवर उपचार करीत असेल तर संबंधितांविरूद्ध तातडीने कारवाई करावी. संंबंधितांविरूद्ध कारवाई झाली नाही तर संबंधित पशूधन पर्यवेक्षांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. दरम्यान, वाकद येथील पशुसंवर्धन दवाखान्यात परिचर म्हणून सेवा देणाऱ्यां त्या तत्कालिन कर्मचाऱ्याला पशूंवर उपचार न करण्याची ताकीद दिली आहे. सदर कर्मचारी वाकद कार्यक्षेत्रात आढळून आल्यास पशुधन पर्यवेक्षकांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे रिसोड येथील पशुसंवर्धन अधिकारी प्रियंका जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वाकद येथील ‘त्या’ संबंधित कर्मचाऱ्यांचा आता पशुसंवर्धन खात्याची कुठलाही संबंध राहिला नाही. यापुढे संबंधित कर्मचारी वाकद  कार्यक्षेत्रात आढळून आल्यास वाकद येथील पशूउपचार केंद्रातील पशुधन पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येईल.- प्रियंका जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड