शेलूमार्गे वाहतुकीत वाढ
शेलूबाजार : वाशिम ते अकाेला शेलूमार्गे रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरून माेठ्या प्रमाणात वाहतुकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मालेगावमार्गे रस्ता नादुरुस्त आहे.
नव्या महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
वाशिम : नव्याने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. वाहने भरधाव वेगाने धावत आहेत.
नाल्यांची दुरवस्था; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : नवीन आययूडीपी कॉलनी परिसरातील काही ठिकाणच्या नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे सांडपाणी जागीच थांबून दुर्गंधी सुटत आहे. नगर परिषदेकडून नाल्यांची स्वच्छता केली जात नाही.
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
वाशिम : प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांनी प्रमुख मार्गावर काही महिन्यांपासून हैदोस घातला आहे.