००००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
रिठद : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने रिठदसह रिसोड तालुक्यातील रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगारसेवक संघटनेने १८ जानेवारी रोजी पंचायत समिती प्रशासनाकडे केली.
०००००
जिल्हा परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण
जऊळका रेल्वे : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे तयारी केली जात आहे. जऊळका रेल्वे केंद्रातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी कामे केली जात असल्याचे दिसून येते.
००००००
वीजपुरवठा खंडित; सिंचनात अडथळा
केनवड : केनवड परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचनात अडथळा निर्माण होत आहे. सध्या गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देणे आवश्यक आहे; मात्र तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा सलग राहत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.