शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित; बेताल वाहतुकीमुळे वाशिम शहरवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:47 IST

वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे.

ठळक मुद्देवाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली दिसून येत आहे. त्याशिवाय भर रस्त्यावर फेरीवाले उभे राहत असल्याने रस्ता अरूंद झाला आहे.एखादे मोठे वाहन रस्त्यावरून जात असताना बराच वेळ वाहतूक खोळंबतांना दिसून येत आहे.

वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरीता रस्त्यांवर उभे राहणाºया फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे आवश्यक झाले आहे. याकडे नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हाधिकारी यांनी लक्ष दिल्यास हा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी कुळकर्णी यांनी याबाबत पुढाकार घेवून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती.

वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली दिसून येत आहे. वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर उभे करून तास न तास येत नसल्याने रस्त्यावर उभे असलेल्या या वाहनांमुळे वाहतुक प्रभावित होवून नागरिकांना त्रास सहन तर करावाच लागत आहे. त्याशिवाय भर रस्त्यावर फेरीवाले उभे राहत असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. एखादे मोठे वाहन रस्त्यावरून जात असताना बराच वेळ वाहतूक खोळंबतांना दिसून येत आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतिने प्रत्येकवेळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्या जात असला तरी थोडयाच वेळाने परिस्थीती जैसे थे होत असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता ठोस उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या आधी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरीता एका खासगी कंत्राटदाराला पार्कींगचे काम देण्यात आले होते. यामुळे बराचसा प्रभाव होवून वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र मधातच काही महिन्यानंतर हे बंद करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बरेच नागरिक या अस्ताव्यस्त वाहतुकीला कंटाळून कुलकर्णी यांनी सुरू केलेली योजना चांगली असल्याचे आज बोलताना दिसून येत आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण शुक्ला यांनी सुध्दा याबाबत याप्रकारची योजना राबवून नागरिकांना होणाारा त्रास दूर करण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.

 जो वाहन पार्कीगचे नियम तोडेल त्याला जागेवरच दंड आकरल्या जात होता. रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनाला ‘जॅमर ’ लावल्याने वाहनधारकाला आपले वाहन घेवून जाता येत नव्हते. यामुळे अनेकांना पार्कीगचे नियम व अटींची जाण झाली होती. मात्र हे बंद झाल्याने शहरातील पार्कीगची व्यवस्था कोलमडलेली आहे. वाशिम शहरातील रस्त्यांवर काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून ठेवल्याने त्यांच्या दुकानासमोर वाहने लावता येत नाही. यामुळे नागरिक आपली वाहने भर रस्त्यावर लावत असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. याकरीताही काही तरी उपाय योजना करणे गरजेचे आहे.अनेकदा एकाच ठिकाणी शहरवाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी उपस्थित असताना सुध्दा विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नाही यावरून शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेची कल्पना करता येईल. तसेच अनेक पोलीस कर्मचारी वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन अव्वाच्या सव्वा रुपये दंड आकारण्याचे काम जसे प्रामाणिकपणे करीत आहेत तसेच कार्य वाहतूक सुरळीततेबाबतही करावे अशी अपेक्षा नागरिकांतून केल्या जात आहे.तरी शहरातील वाहतूक व्यवस्थेची बिघडलेली घडी सुरळीत करण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.  (प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी