शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 14:15 IST

ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.

- साहेबराव राठोड   शेलुबाजार : कुठेही शिव मदिरामध्ये शिवाची किंवा पार्वतीची मुर्ती आढळून येत नाही. बहुतांश मंदिरात लिंग दिसून येते. परंतु वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर तालुकयात असलेल्या ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.समाजामध्ये ज्या प्रमाणे लग्न लावल्या जातात त्याच प्रमाणे हा संपूर्ण सोहळा असतो. लग्नपत्रिकाऐवजी येथे कार्यक्रम पत्रिका प्रकाशित करुन त्यामध्ये लग्नसोहळयाची वेळ नमूद केल्या जाते. दरवर्षी बारसनिमित्त हा सोहळा पार पडतो. रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांच्या स्वागतापासून तर त्यांना अक्षदा देण्याचे कार्य गावकरी करतात. लग्न सोहळा आटोपल्यानंतर पंगता बसविण्यात येतात. यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात. या कार्यक्रमाचा विडा गावातील अनिल बळीराम राऊत, मनोहर ज्ञानदेव वानखडे, ओकांर शंकरराव राऊत, मोहन विठ्ठल्राव राऊत यांनी उचलला होता. विशेष म्हणजे या लग्नसोहळयाची तयारी एक महिन्यापूर्वीपासून सुरु होते. या तयारीसाठी श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा नागीचे सर्व विश्वस्त व भाविक प्रयत्नशिल असतात.या कार्यक्रमानिमित्त भव्य यात्रा व महाप्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी ९ एप्रिल ते १३एप्रिलपर्यंत श्रीमद भागवत कथा घेण्यात आली. विविध नामांकित मान्यवरांची किर्तने यावेळी पार पडली. १४ ते १६ विविध किर्तनकारांची किर्तने व १६ एप्रिल रोजी शिवपार्वती पूजा , महाआरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित आहे.या कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन ईचा नागी येथील शिव पार्वती मंदिर संस्थानच्यावतिने करण्यात आले आहे.

शेकडो वर्षापासून लागतेय लग्नमंगरुळपीर तालुक्यातील ईचा नागी येथे शिव पार्वती विवाह सोहळयाची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची असल्याचे भाविक सांगतात. यात्रेत असलेले ९० वर्षिय भाविकांने सांगितले की, मी लहान असतांना सुध्दा या सोहळयासाठी येत होतो. नेमके ही परंपरा कधी सुरु झाली हे सांगता येत नसले तरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालु असल्याचे ९० वर्षिय भाविकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा