शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयाचे नाणे स्विकारण्यास व्यापाऱ्यांची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:12 IST

शिरपूर जैन (वाशिम) : १० रुपयाचे नाणे हे चलनातून बाद होत असल्याच्या अफवेमुळे व्यापारी तसेच काही ग्राहकही १० रुपयाचे नाणे स्विकारण्यास नकार देत असल्याचा प्रकार शिरपूर परिसरातून समोर येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : १० रुपयाचे नाणे हे चलनातून बाद होत असल्याच्या अफवेमुळे व्यापारी तसेच काही ग्राहकही १० रुपयाचे नाणे स्विकारण्यास नकार देत असल्याचा प्रकार शिरपूर परिसरातून समोर येत आहे. शिरपूर परिसरातील बाजारपेठेत चिल्लर नाण्यांसह १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. दुसरीकडे गत पाच ते सहा महिन्यांपासून दोन हजार रुपयांची नोट जणू गायबच झाल्यागत दिसून येत आहे. सद्यस्थितीत व्यापाºयांकडे चिल्लर नाण्यांसह १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. चिल्लरअभावी व्यवहारात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून काही महिन्यांपूर्वी व्यापारी हे  १, २ व ५ रुपयांचे नाणे हे पाच ते १० रुपये शेकडा कट्टीने घेत होते. अलिकडच्या काळात १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आल्याने चिल्लरची टंचाई भासत नाही. याचप्रमाणे १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटाही बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसरीकडे १० रुपयांचे नाणे चलनातून बाद होणार असल्याच्या अफवेने आजही सदर नाणे स्विकारण्यास व्यापाºयांप्रमाणेच काही ग्राहकही तयार नसल्याचे दिसून येते. १० रुपयाच्या नाण्यांवरून परिसरात बºयाच वेळा ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही घडते. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद होणार असल्याची केवळ अफवा असल्याने व्यापारी तसेच ग्राहकांनीदेखील १० रुपयांचे नाणे स्विकारावे, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार