मंगरुळपीर (जि. वाशिम) : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ५ जुलै रोजी एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.मंगरुळपीर तालुक्यातील एका पीडित महिलेने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, की आरोपी अजय बुरे याने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, सहकलम ३, ४, पास्को अँक्ट २0१२, सहकलम ३ (१) (१२) अनुसूचित जाती अधिनियम १९८९ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By admin | Updated: July 7, 2016 02:06 IST