लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सर्वत्र मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. त्या पृष्ठभूमिवर ४ सप्टेंबरपासूनच ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तथापि, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान नियमबाह्य वर्तन करणार्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मिना यांनी दिला.यानिमित्त वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षकांनी आपल्या अधिनस्त पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना गणेश विसर्जन मिरवणूकीतील बंदोबस्ताविषयी मार्गदर्शन केले. मिरवणूकीमध्ये कायदा तोडणार्यांची हयगय न करता थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:29 IST
वाशिम: जिल्ह्यात सर्वत्र मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. त्या पृष्ठभूमिवर ४ सप्टेंबरपासूनच ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तथापि, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान नियमबाह्य वर्तन करणार्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मिना यांनी दिला.
ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात!
ठळक मुद्देगणेश विसर्जननियमांचा भंग करणार्यांवर कारवाइचा इशारा