लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला प्रकल्प आराखडा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.२० शेतकरी गटांच्या माध्यमातून किमान १०० एकर शेतावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृषी पुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी पात्र असून, गटातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे बंधनकारक आहे. या योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये वाशिम जिल्हयासाठी सहा गट स्थापन करावयाचे आहेत. सदर योजनेतर्गत शेतकरी गटाकडून होणाºया कामांना विविध चार टप्प्यामध्ये निधी वितरण होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी गटांनी आपला प्रकल्प आराखडा ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.
प्रकल्प आराखडा सादर करण्याची उद्या अंतिम मुदत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:34 IST
गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला प्रकल्प आराखडा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. २० शेतकरी गटांच्या माध्यमातून किमान १०० एकर शेतावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृ
प्रकल्प आराखडा सादर करण्याची उद्या अंतिम मुदत !
ठळक मुद्देगट शेती प्रोत्साहन व सबलीकरणा योजना पथदर्शी प्रकल्प