शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी

By सुनील काकडे | Updated: June 8, 2023 19:01 IST

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे.

वाशिम: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिर्डी येथे ८ जून रोजी टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले असून याअंतर्गत महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचे टायर तपासले जाणार आहेत, अशी माहिती वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होवून ११ डिसेंबर २०२२ पासून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यानंतर २६ मे २०२३ पासून शिर्डी ते भरवीर या पुढील मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हा मार्गही वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

महामार्गावर रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध स्वरूपातील उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातापैकी अधिकांश अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील अपघातात घट करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सीएट लिमिटेड टायर उत्पादकांमार्फत त्यांच्या तांत्रिक चमूच्या सहकार्याने वाहनांच्या टायर तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. तपासणी केंद्रावर न्यावे लागणार वाहनमहामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर योग्य गुणवत्तेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रवासाच्या सुरूवातीला टायर तपासणी केंद्रावर वाहन नेऊन टायर तपासून घ्यावे लागणार आहे. विविध सुविधा मोफत उपलब्धप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती आणि टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.      

आयुक्तांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटननागपूर व शिर्डी या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील टोल प्लाजाच्या सुरूवातीला टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन ८ जून रोजी शिर्डी येथे परिवहन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग