लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : किनखेडा परिसरात गत चार-पाच दिवसांपासून चोरट्यांनी धुुमाकूळ घातला आहे.किनखेडा येथील विठ्ठल गजानन देशमुख यांची एमएच ३७-एस-४३५३ क्रमांकाची मोटारसायकल ११ जुलै रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरासमोरून लंपास केली. बोलेरो पिकअम वाहनातून तीन अज्ञात इसम सदर मोटारसायकल चोरून नेताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. याबाबत विठ्ठल देशमुख यांच्या फिर्यादीवरुन रिसोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी बसस्टँडवरील कैलास खंडारे यांच्या किराणा दुकानात चोरी झाली, तर गजानन अंभोरे यांच्या शेतातील कृषी साहित्य पेटवून देण्यात आले, तर विजेचे तार जोडणी काम सुुरू असताना भरदिवसा लंपास केले होते.
चोरट्यांचा धुमाकूळ!
By admin | Updated: July 13, 2017 01:45 IST