मानोरा : पोलिस स्टेशनअंतर्गत येत असणाऱ्या उमरी खुर्द येथील फिर्यादी विजय रावजी राठोड (वय ६० वर्षे) यांना आरोपी बाबा शेषराव राठोड यांनी शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध ९ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, नमुद आरोपी बाबा शेषराव राठोड याने आज ९ मे रोजी च्या सकाळी घराचे दरवाजे, खिडक्या बसविल्यावरुन वाद घातला. शिविगाळ करुन फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द मानोरा पोलिसांनी कलम २९४, ५०४, ५०६ भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास बिट जमादार शिवा राठोड, इश्वर बाकल करीत आहेत.
शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी!
By admin | Updated: May 10, 2017 07:06 IST