शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्र सिंचन योजनेतील हजारो विहिरी अद्याप अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:01 IST

सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक हजार याप्रमाणे विहिरी मंजूर झाल्या. मात्र, मजूर न मिळण्याच्या मुख्य अडचणीसह अन्य काही कारणांनी हजारो विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक हजार याप्रमाणे विहिरी मंजूर झाल्या. मात्र, मजूर न मिळण्याच्या मुख्य अडचणीसह अन्य काही कारणांनी हजारो विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये तुलनेने मोठ्या सिंचन प्रकल्पांची संख्या कमी आहे. त्यामुळे सिंचनासाठी अन्य स्वरूपातील जलस्त्रोत तयार करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, शारिरिकदृष्ट्या विकलांग, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, याप्रमाणे लाभार्थींची निवड करण्याचे निश्चित करून संबंधितांकडून पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत रितसर अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार, शेकडो लाभार्थींनी स्वयंस्फूर्तीने अर्ज देखील केले. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्हानिहाय मंजूर ६ हजार विहिरींपैकी बहुतांश विहिरींची कामे अपुर्णावस्थेत रखडलेली आहेत. या कामांवरील जॉबकार्डधारक मजुरांना केवळ २०१ रुपये मजूरी मिळत असल्याने त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही कामे अपूर्ण!सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत अपूर्ण असलेल्या विहिरींप्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून तातडीने विहिरी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींसोबतच इतर प्रशासकीय यंत्रणांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्याऊपरही कामे मंदगतीनेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सहस्त्र सिंचन योजनेत समाविष्ट विहिरी पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर नियमित आढावा घेतला जात आहे. हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना