तळप बु. (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत असून, योजनेची जलवाहिनी पसिरात अनेक ठिकाणी फुटली असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून त्यामधून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्याशिवाय एअर व्हॉल्व्हही नादुरुस्त असल्यामुळे बर्याच ठिकाणी पाणी वाया जात आहे. याबाबत संबंधित विभागांना माहिती असूनही त्यांच्याकडून त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी या योजनेत समाविष्ट गावांतील जनतेला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणीपुरवठा कायमचा निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २00७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा अस्तित्वात आली. २८ गावासाठी ही योजना अस्तित्वात आली असली तरी आज रोजी तळप, कार्ली, रामतीर्थ, सेवादासनगर, पाळोदी आणि आसोला खुर्द या १५ गावामध्येच पाणीपुरवठा सुरू आहे आणि या १५ गावांना ही योजना आज वरदान ठरत आहे. कारण या १५ गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य पाणीपुरवठा योजना सक्षम नसल्यामुळे सदरहून योजनाच या गावांची तहान भागवित आहे; परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी भागववित आहे. परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी उघडी असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून या गावांचा पाणी पुरवठा खंडित होतो. तळप बु. ग्रा.पं. पाणीपुरवठा पाण्याअभावी बंद असून, याच योजनेवर हे गाव अवलंबून आहे; परंतु गावालगत एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी असल्यामुळे त्या ठिकाणी पाइपलाइन फुटून वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. तेथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग कारंजा यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष हाते आहे तसेच दिग्रस शहरानजीक एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी पडली आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन अनेक वेळा पाइपलाइन वाहून गेलेली आहे.
मजीप्राच्या वाहिनीतून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय!
By admin | Updated: March 14, 2016 02:04 IST