शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ातील हजारो शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:09 IST

मालेगाव येथील ना़. ना. मुंदडा या खासगी बाजार समितीने विहीत मुदतीत सोयाबीन खरेदीच्या नोंदी आॅनलाइन केल्या नाहीत़  परिणामी, हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. सोयाबीनचे अनुदान मिळणार नसल्याने शेतक-यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार नोंदवून न्यायाची मागणी केली़. 

ठळक मुद्देमुंदडा बाजार समितीमधील प्रकारबाजार समितीच्या चुकीमुळे शेतक-यांना फटका  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांना २०० रुपए प्रति क्विंटल अनुदाल देण्याचा निर्णय घेण्यात आला़. त्यानुसार अनुदान वितरणासाठी  १४ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली़  मात्र, मालेगाव येथील ना़. ना. मुंदडा या खासगी बाजार समितीने विहीत मुदतीत सोयाबीन खरेदीच्या नोंदी आॅनलाइन केल्या नाहीत़  परिणामी, हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. सोयाबीनचे अनुदान मिळणार नसल्याने शेतक-यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार नोंदवून न्यायाची मागणी केली़. शासनाने  १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला़  त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दरदिवशी केलेल्या खरेदीचा लेखाजोखा आॅनलाइन भरुन तशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे देणे बंधनकारक होते़  त्यानुसार इतर बाजार समित्यांच्या नोंदीनुसार ४४ हजार पात्र शेतकरी सभासदांकरीता कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला. मालेगाव येथील ना. ना. मुंदडा या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने उपरोक्त कालावधीत तब्बल ६७ हजार ५२९ क्वंटल सोयाबीनची खरेदी केली़  यासाठी जिल्ह्याला सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये अतिरिक्त रक्कम मिळणे अपेक्षीत होते; परंतु बाजार समिती प्रशासनाने याचा लेखाजोखा देण्यास हलगर्जी केल्यामुळे या बाजार समितीत सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांची नावे अनुदानास पात्र लाभार्थींच्या यादीत आली नाही़  त्यामुळे हजारो शेतकºयांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येवून ठेपली़ सोयाबीन अनुदानापासून वंचित शेतकºयांना न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतक-यांनी डीडीआरजिल्हा उपनिबंधकांनाा निवेदनाव्दारे दिला आहे़

जिल्ह्यात एकूण १० कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात असून त्यापैकी ४ खासगी बाजार समित्या आहेत. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बाजार समितीने खरेदी केलेल्या  सोयाबीनची नोंद आॅनलाइन करुन दरदिवशी उपनिबंधक कार्यालयाला माहिती देणे बंधनकारक होते़  ना. ना. मुंदडा या खासगी बाजार समिती प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतक-यांना अनुदान मिळाले नाही़  त्यामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकºयांचे निवेदन मिळाले. सदर मागणी शासनापर्यंत पोहचवून अनुदानापासून वंचित शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे़- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी