शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ पाणी पुरवठा योजनांना मिळणार ‘सौर ऊर्जा’ - राजेंद्र पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 19:37 IST

वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली

ठळक मुद्देआमदार पाटणी यांच्या प्रयत्नांना यश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी मागणी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी उर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्फत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश दिले असुन संबंधित ग्रामपंचायत मार्फत आलेला प्रस्ताव तातडीने पाठविण्यासाठी आदेशीत केले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध केला असुन निवड झालेल्या  ग्रामपंचायतींचे काम तातडीने सुरू होणार आहे. उन्हाळ्यापुर्वी निवड झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे पाटणी यांनी सांगितले. भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांचा समावेश सौर ऊर्जेवर करण्यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली होती. सौर ऊर्जा योजना मंजुर झाल्यास सलग १२ तास ग्रामीण भागात पाणी पुरवठा होणार आहे.  अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून येत्या पाच वर्षात १४ हजार ४०० मेगॉव्हॅट वीज निर्मितीसह ४० लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असे पाटणी यांना प्रसिद्धी पत्रकात म्हटले.  सौर ऊर्जच्या माध्यमातून वीज देयकामध्ये ५० टक्के बचत होत असल्यामुळे सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापरासाठी शासनाने नवीन धोरण ठरविले आहे. शेतकºयांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीक वाचवू शकत नाहीत. या नैराश्यातून शेतकºयांच्या बहुतांश आत्महत्या झाल्या आहेत. अशा शेतकºयांच्या कुटुंबियांना अत्यंत अल्पदरात सौर कृषी पंप देण्यात यावा तसेच विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पाटणी यांनी ना.बावनकुळे यांचेकडे केली होती. 

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीWaterपाणी