रिसोड (वाशिम): एका वृध्द महिलेस धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने पळविणार्या चोरास मुद्देमालासह पकडल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली.तालुक्यातील मोप येथील वयोवृध्द महिला लोणी रोड वरील शेतामध्ये गवत कापण्याचे काम करीत असताना महिलेस मारहाण करून तीच्या शरीरावरील सोने व चांदीचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी शेतशिवारात घडली होती. या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागल्यानंतर तपासाअंती गावातील अच्युतराव मोरे यास अटक करून त्याच्याकडील ३ तोळे सोने, ४0 तोळे चांदी असे एकूण ९५000 रूपयाचा माल जप्त केला आहे. आरोपीस अटक करून त्याच्याविरूध्द कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरी गेलेल्या ऐवजासह चोरटा जेरबंद
By admin | Updated: December 3, 2014 23:50 IST