शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने एटीएम फोडले; १३.३० लाख लंपास, सुरक्षा रक्षकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:16 IST

मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी (रोड) येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्याने १३ लाख ३० हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना ८ मे रोजी रात्री दरम्यान घडली. गतवर्षीसुद्धा याच बँकेच्या एटीएमवर चोरट्यानी डल्ला मारला होता, हे विशेष.

मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी (रोड) येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्याने १३ लाख ३० हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना ८ मे रोजी रात्री दरम्यान घडली. गतवर्षीसुद्धा याच बँकेच्या एटीएमवर चोरट्यानी डल्ला मारला होता, हे विशेष.

चॅनल मॅनेजर राहुल वासुदेवराव गहुले (२८) रा. कौलखेड अकोला यांच्या फिर्यादीनुसार ते ईपीएस मुख्यालय मुंबई या कंपनीत ‘चॅनल मॅनेजर’ या पदावर  काम पाहतात. शिवणी रोड येथील एसबीआयच्या एटीएमचे सुद्धा काम त्यांच्याकडे असून ९ मे रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, अशी माहिती एटीएम जागेचे मालक अनिल चव्हाण यांनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

अज्ञात चोरट्याने गॅस कटरने एटीएम मशीन कापून त्यातील १३ लाख ३० हजार ३०० रुपये रोख चोरून नेले व एटीएम मशीनचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८०, ४२७ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

गतवर्षीसुद्धा याच ठिकाणचे एटीएम चोरट्यांनी फोडले होते. याठिकाणी बँकेने सुरक्षा रक्षक ठेवला नसल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी